वेलकम स्कूलमध्ये दिवाळी सण साजरा
शबनम न्यूज : मारुंजी (दि. २७) – शमीन हुसेन फाऊंडेशन संचलित वेलकम स्कूल मारुंजी येथे दिवाळी सण साजरा करण्यात आला. शाळेतील लहान मुला – मुलींनी मोठ्या आनंदाने फुलबाजे व फटाके वाजवून दिवाळी सण साजरा केला. या दिवाळी सणानिमित्त वेलकम स्कूल चा परिसर हा रांगोळी व आकाश दिवे तसेच अनेक दिव्यांच्या लखलखाटीत सुशोभित करण्यात आला होता.
या दिवाळी समारंभ प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका संचालिका शबनम सय्यद या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन वेलकम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अविना बुचडे तसेच शाळेच्या शिक्षिका सौ. सत्यभामा थोपटे, सौ. पुनम रावण ,सौ. भाग्यश्री ठाकूर ,सौ. सुषमा काटकर ,सौ. वनिता ताई चाटे व सौ .कौशल्या ताई यांनी केले होते.
सदर कार्यक्रमांमध्ये वेलकम स्कूलचे सर्व विद्यार्थी , विद्यार्थिनी , पालक वर्ग यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला व हा सर्वांचाच आवडीचा दिवाळी सण आनंदाने साजरा केला.