WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

राहुल गांधींनी राजीनामा दिला, पण कार्यकारिणीने फेटाळला

SHABNAM NEWS : 25 MAY – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली. त्यांनी बैठकीत राजीनाम्याचा प्रस्तावही दिला. पण कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत.  राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतते अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. राहुल गांधी यांनी बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. पण कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

 

ताज्या बातम्या