Sun. Jul 12th, 2020

शिवसेनेचे आमदार अपक्ष निवडणूक लढविणार

शबनम न्युज : चंद्रपूर – शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी अखेर शिवसेनेला राम-राम ठोकला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला असून धानोरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुखांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा पाठवला आहे .

बाळू धानोरकर चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आमदार आहेत. वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसच्या जाण्याच्या हालचाली आधीपासूनच सुरू होत्या. मात्र धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, शिवसेनेत नाराजांची संख्या वाढत आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी तर राष्ट्रवादिमध्ये प्रवेश केला. जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर नाराज आहेत. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांची समजूत काढण्यात शिवसेनेला यश आले आहे. मात्र स्थानिक पातळीवर युती कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले नाही, हे स्पष्ट होत आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!