शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील गवळीनगर प्रभागातील नामदेव ढवळे आजोबा यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. कुटुंबियांनाही कोरोनाने ग्रासले होते. आजी हिराबाई ढवळे वय वर्ष 92 यांना जागेवरुन हलता येत नव्हते. बेडवरून उतरता येत नव्हते अशा वेळी त्यांची कोरोना टेस्ट होण खूप गरजेचं होतं .त्यांची ही अडचण समजल्यावर नगरसेविका प्रियांका बारसे यांनी नगरपालिकेच्या दवाखान्यातल्या अधिकार्यांशी डॉक्टरांशी संपर्क साधून ढवळे यांचे घरी येऊन तपासणी करावी असा प्रयत्न केला.
तथापि त्यात अपयश आले .कारण सध्या कोरोना काळात सर्व डॉक्टर-नर्स यांना वेगवेगळ्या ड्युट्या लागलेल्या आहेत .अशा वेळी धावडे वस्ती वरील एका खाजगी लॅबशी संपर्क साधून स्वतः नगर सेविका बारसे यांनी तेथिल आरोग्य कर्मचाऱ्यांना घेऊन आल्या. त्यांची आरोग्य तपासणी – कोरोना टेस्ट केली व आपले जनसेवेचे व्रत पूर्ण केलं.
मागील मार्च महिन्यात कोरोना सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत जनसेवा चालूच ठेवली आहे. नगरसेविका बारसे यांनी धान्य वाटप, खाऊ वाटप ,डॉक्टर आपल्या दारी, आरोग्य तपासणी ,रक्तदान शिबिर,मास्क -सॅनिटायझर -स्टॅन्ड वाटप यातून आपलं सामाजिक कार्य सुरूच ठेवलं आहे.
खर तर पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रियांका बारसे यांनी केले आहे.
आरोग्य व्यवस्था जोरात कामाला लागली आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या काही कमी होत नाही.
परिणामी कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. शासनाच्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी. जेणेकरुन सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू. शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केले आहे.