शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारींना वयाची अट न ठेवता लवकरात लवकर कोविड लस उपलब्ध करून द्यावी – नगरसेविका प्रियांका बारसे

0
173
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

नगरसेविका प्रियांका बारसे यांची आयुक्तांकडे मागणी

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्याच बरोबर कोविड लसीकरण प्रक्रियेला जोरदार सुरुवात झाली आहे.
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खंबीरपणे उभे राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली.
दुसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे .पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या आरोग्य महानगरपालिका कर्मचारी कचरावेचक अशा सर्वांना प्राधान्य देण्यात आले.

त्या पार्श्वभूमीवर शहरातील मनपा व खाजगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचे सहकार्य पिंपरी-चिंचवड शहराला मोठ्या प्रमाणात आहे . कोविडयोध्दा म्हणून अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कोरोना काळात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला सहकार्य केलेले आहे.

मनपा क्षेत्रातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींना वयाची अट न ठेवता सर्वांना कोविड लस‌ मोफत उपलब्ध करून द्यावी.
कारण लहान विद्यार्थ्यांच्या संपर्कात शिक्षकवर्ग येतो व संसर्गाचा धोका वाढतो .हा संसर्ग कुटुंबाद्वारे समाजामध्ये पसरू शकतो.

रोजची शिक्षकांची ५०% उपस्थिती व पुढील काळात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा शाळांमध्ये चालू होणार आहेत हे लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण सुरू करावे असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी माननीय आयुक्त मनपा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleपार्थ पवार यांच्या वाढ दिवस निमित्त ‘मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर’
Next articleमहापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार – सचिन साठे