पिंपरी / शबनम न्युज
प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवाशी हे सततच्या विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या समस्येला सध्या सामोरे जात आहेत. पाणी यायच्या वेळात विद्युत प्रवाह खंडित झाल्यास मोटारीने पाणी वरच्या मजल्यावर चढवता येत नाही त्यामुळे महिलांमध्ये विद्युत वितरण कंपनी विषयाचा रोष आहे. व तसेच आय.टी. क्षेत्रातील कामगार वर्ग घरून काम म्हणजेच (Work for home) करत असल्याने ते काम संपूर्णतः कम्प्युटर वर अवलंबून असते.
विद्युत प्रवाह खंडित झाल्याने त्यांना आपले काम करता येत नाही त्यामुळे ते आपल्या कर्तव्यास मुकले जातात. तसेच सध्या covid-19 च्या संक्रमण काळात विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेत असून विद्युत प्रवाह खंडित झाल्यावर त्यांचे क्लास बुडत आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १५ तर्फे बुधवार दिनांक. २१/१०/२०२० रोजी सकाळी १०:०० वा भेळ चौक ते महावितरण कंपनी पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपमहापौर, नगरसेविका पिं.चिं.मनपा शैलजा मोरे व उपाध्यक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भा.ज.पा अनुप मोरे यांनी केले आहे.