जिजाऊ ब्रिगेडच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी सौ सायली सचिन शिंदे
जिजाऊ ब्रिगेडच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी सौ सायली सचिन शिंदे
शबनम न्यूज : दि.१६ – प्रतिनिधी (मावळ): सौ सायली सचिन शिंदे यांची मुळशी तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र प्रा. जयश्री गटकुळ यांनी सायली शिंदे यांना दिले. नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की सायली शिंदे या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, या निकषाद्वारे मुळशी तालुका जिजाऊ ब्रिगेड अंतर्गत कार्यरत राहून पीडित अन्यायग्रस्त महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शैक्षणिक सामाजिक उपक्रम अंतर्गत विधायक कार्य करण्यासाठी नव्या युवापिढीला प्रोत्साहन प्रेरणा देण्यासाठी प्रगल्भ प्रभावी वक्तृत्व कणखर लढवय्या निर्भीड अभ्यासू कर्तुत्ववान असा महिला भगिनींना समाजात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड महिला संघटना मजबूत करण्यासाठी मुळशी तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा या पदावर मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड कार्यकारिणी यांचे संयुक्त निर्णयातून निवड करण्यात येत आहे.
या निवडीनंतर सौ सायली शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आपणास या मिळाल्या जबाबदारीला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू व समाजातील गरीब तसेच गरजवंत व दुर्बल घटकातील महिलांना तसेच अन्यायाचा सामना करणाऱ्या नागरिकांना, महिलांना संस्थेमार्फत योग्य न्याय देण्याचेही कार्य करणार असल्याचे नियुक्तीनंतर सायली शिंदे यांनी सांगितले.