Sun. Sep 20th, 2020

सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

शबनम न्यूज – 15 सप्टेंबर (प्रतिनिधी )पुणे : सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने नानल आयुर्वेदचे मालक आशुतोष नानल यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या सर्व सभासद तथा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नानल आयुर्वेदचे मालक आशुतोष नानल, सर्वाधिकार पत्रकार संघाचे अध्यक्ष कांचन बडवणे, संघाचे उपाध्यक्ष संतोष सागवेकर, संघाचे संघटक सिमोन सातपुते, नवोदित सल्लागार संकेत खरपुडे, शिरूर तालुकाध्यक्ष सचिन नप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पाहायला मिळतो आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची होती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी सत्य परिस्थिती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. अशी भावना नानल आयुर्वेदचे मालक आशुतोष नानल यांनी व्यक्त केली.

सर्वाधिकार पत्रकार संघ हे पत्रकारांच्या हिताबरोबरच त्यांच्या इतर सुविधांकडे ही लक्ष देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीत आहे. ब, क, आणि ड श्रेणीतील पत्रकारांकडे विशेषतः कोणी लक्ष देत नाही परंतु संघामार्फत या वर्गासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पत्रकारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी लवकरच अधिवेशन भरविण्यात येणार आहे अशी माहिती सर्वाधिकार पत्रकार संघाच्या अध्यक्षा कांचनताई बडवणे यांनी दिली.

सर्वाधिकार पत्रकार संघाची स्थापना पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी झालेली आहे. पत्रकारांचे सर्वाधिकार त्यांना मिळालेच पाहिजे असे प्रखर मत संघाचे उपाध्यक्ष संतोष सागवेकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पत्रकारांना संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, पत्रकारांना पेंशन योजना देण्यात यावी, पत्रकारांना टोलमुक्ती व्हावी, पत्रकारांच्या मुलांना शिक्षणात आर्थिक सूट मिळावी, पत्रकारांना घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे, पत्रकारांना विमा संरक्षण द्यावे या मागणीसाठी आम्ही लढा देत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी फार संघर्ष करावा लागला आहे परंतु आता संघामार्फत आम्ही त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत असे संघाचे संघटक सिमोन सातपुते यांनी सांगितले.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!