Tue. May 26th, 2020

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. ०९ एप्रिल) – कोरोना विषाणू चे संकट संपूर्ण जगावर असताना संपूर्ण देशाबरोबरच पुणे शहरातील कोरणा विषाणू संसर्ग प्रादुर्भावा च्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेली संचारबंदी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून अधिक कडक करण्यात आली असून पालिका हद्दीतील भोसरी गावात कोरोना चा एक संशयित रुग्ण आढळल्या मुळे भोसरी गाव दिनांक 10 एप्रिल पासून ते 12 एप्रिल पर्यंत या तीन दिवसासाठी पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याची घोषणा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे या तीन दिवसात भाजीपाला ,किराणा , दूध पुरवठा सारख्या जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील पूर्णपणे बंद राहणार आहे तरी भोसरी ग्रामस्थ व गावातील सर्व व्यापारी .दुकानदार मंडळींनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे व नागरिकांनी या दिवसात कुठल्याही प्रकारच्या कामासाठी घराबाहेर पडू नये असेही महेश लांडगे यांनी भोसरी ग्रामस्थांना आवाहन केले आहे

 

 

 

 

 

ताज्या बातम्या