Mon. Mar 30th, 2020

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. २५ मार्च) – अत्यावश्‍यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी पीएमपीएमएलची सेवा सध्या सुरू आहे. ओळखपत्र पाहूनच या कर्मचाऱ्यांना “पीएमपी’ बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली आहे.

 

 

 

 

 

 

मात्र अत्यावश्‍यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलची सेवा सध्या सुरू आहे. प्रत्येक बसवर “अत्यावश्‍यक सेवा’ म्हणून फलकही लावण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवेत काम करणारा कर्मचारी आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येकाचे ओळखपत्र तपासूनच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना या बसमध्ये प्रवेश दिला जात नाही.

 

ताज्या बातम्या