Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासीयांशी संवाद

शबनम न्यूज : दिल्ली (दि. २४ मार्च ) – देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधतील.

 

 

 

 

 

“लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले होते.

 

ताज्या बातम्या