Sun. Jul 12th, 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे तालूका आरोग्य अधिका-यासह इतरावर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

शबनम न्यूज : पुणे (दि.१४ जानेवारी २०२०) :-  केंद्र शासनाच्या  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य व शहरी आरोग्यासाठी मोठय़ा प्रमाणात केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिला जातो.आरोग्य व्यवस्था बळकटीकरणापासून ते संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांसाठी केंद्राकडून  राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत राज्याच्या आरोग्यविभागाला हजारो कोटी रुपये मिळाले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सदर नीधी पुर्ण खर्च होत नसल्याचे अनेक आवाहालातून  समोर आले.  अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य व शहरी आरोग्यासाठी मोठय़ा प्रमाणात केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिला जातो.  निधीचा वापर न झाल्यास पुढील वर्षी तेवढी रक्कम केंद्राकडून कमी दिली जाते. तर केंद्राने दिलेल्या निधीचा पूर्णपणे वापर केल्यास केंद्राकडून १० टक्के बोनस म्हणून अतिरिक्त निधी दिला जातो. आणि म्हणूनच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतचा नीधी खर्च करण्यासाठी आरोग्य सुविधा दिल्याचे खोटे दस्ताऐवज तयार करुन त्याव्दारे कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला जात आहे. हा भ्रष्टाचारातील दोषीवर कारवाई होणे कामी जर  राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्गत २०१९ मार्च अखे झालेल्या महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परीषेधकडून एन.सी.डी कँम्प करीता दिलेला नीधी व त्यात ज्या डॉक्टर यांनी सेवाबाबत घेतले मानधन याची चौकशी केली तर असे एन.सी.डी कँम्प न करताच कोट्यावधी रुपयाच्या शासन नीधीचा अपहार झालेला आहे हे उघड होईल याचे देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड हॉस्पिटल एक प्रातिनिधीक स्वरुप आहे.
     मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या अध्यक्ष विकास कुचेकर व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. ११/३/२०१९ रोजी कोणतेही आरोग्य शिबीर अथवा मेडीकल कँम्प झालेला नाही असी माहीती माहीती अधिकारात दिली. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियान तालूका आरोग्य अधिकारी पंचायत समिती तालूका हवेली यांच्या कार्यालयातून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनूसार दि. ११/३/२०१९ रोजी देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड हॉस्पिटलमध्ये एन.सी.डी आरोग्य शिबिर झाला आहे. त्यासाठी करण्यात आलेली जाहीरात, लावलेला मंडप, विशेषतज्ञ डॉक्टर, चहापान इत्यादीसाठी झालेल्या खर्चाची बीलसह त्याचे एकूण ४० हजार रुपये जिल्हापरीषेधकडून देण्यात आलेले धनादेश नबर सह माहिती देण्यात आली. देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्डकडून मिळालेली माहीती व राष्ट्रीय आरोग्य अभियान पंचायत समिती हवेली यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन तालूका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात तसेच त्यांचे देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड येथे नियुक्त कर्मचारी सुप्रीया वाघमारे देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड हॉस्पिटलचे तात्कालीन आर.एम. ओ. डॉ. वाघचोरे यांनी संघनमताने एन.सी.डी. कँम्पचे बनावट दस्ताऐवज तयार करुन त्याव्दारे जिल्हा परीषेध पुणे यांच्याकडून पैसाचा अपहार व भ्रष्टाचार केल्याची तक्रार देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरीतवाल, जिल्हा परीषेध सी.ई.ओ. आणि समर्थ पोलिस ठाणे पुणे यांच्याकडे मानवी हक्क व जागृती संस्थेचे अध्यक्ष संरक्षण विकास कुचेकर यांनी दाखल केली. मात्र संबधित कोणत्याच यंत्रणेकडून सदर तक्रारीची दखल घेतली नाही म्हणुन त्यांनी संस्थेचे कायदेविषयक सल्लागार अँड. विवेक गौड यांच्या मार्फत शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला. त्यावरुन मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी सदर प्रकरणातील लोकांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
   यावेळी विकास कुचेकर यांनी सांगितले की देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्ड भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा सीबीआय कडून कारवाई झाली आहे. असे असले तरी कायद्याची भिती संबधित ठिकाणील कर्मचारी अधिकारी यांना राहीलेली नाही. देहुरोड कँन्टामेंन्ट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रामस्वरुप हरीतवाल भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत. पुराव्या सह तक्रार करुन ही कारवाई करत नाहीत येवडेच काय जिल्हा परीषेध पुणे यांच्याकडून दर महा मोठ्या प्रमाणात औषधसाठा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उद्देश पुर्तीकरीता दिला जातो पण त्याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही व  जिल्हा परीषेधकडे दिलेला नाही. औषधचा ही मोठा अपहार केला जात आहे. यामुळे गरीबांनसाठी केंद्र व राज्य शासनाने आरोग्य सुविधानकरीता हजारो कोटीच्या केलेल्या तरतुदी तरी आरोग्य सुविधापासून नागरीक वंचित.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!