शिवप्रेमींच्या संतापापुढे भाजपने टेकले गुडघे; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश
शबनम न्यूज : राष्ट्रीय (दि.१३ जानेवारी २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग सुरु होतं. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यानंतर अखेर भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश भाजपने दिले आहे. यामुळे या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु झालेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रदर्शित केल्याची माहिती दिली होती. हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचं भाजपचे नेते श्याम जाजू यांनी सांगितले.