Thu. Aug 6th, 2020

धक्कादायक : राजकीय नेत्याची गोळ्या घालून हत्या

शबनम न्यूज : लखनऊ (दि.१३ जानेवारी २०२०) :- उत्तर प्रदेशातील मऊमध्ये रविवारी सकाळी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते बिजली यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहम्मदाबाद परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर अज्ञात हल्लेखोर फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजली यादव सकाळी घराबाहेर गेले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान, बिजली यादव यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!