WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

प्रियकरानेच महिलेचा खून करून तिचा मृतदेह फेकला

शबनम न्यूज : नागपूर (दि.०७) – अनैतिक संबंधातून प्रियकरानेच महिलेचा खून करून तिचा मृतदेह फेकला होता. तो बुटीबोरी पोलीस हद्दीत सापडला होता. गिट्टीखदान पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपीला पकडले.

शारदा अरविंद शिंदे (३३) रा. चिंतामणीनगर असे मृत महिलेचे नाव असून चंद्रकांत एकनाथ वानी (४७) रा. शुभारंभ सोसायटी याला अटक केली आहे. शारदा ही इटर्निटी पीव्हीआर सिनेमागृहात सफाई कामगार होती. २ डिसेंबरला ती कामावरून परतली नव्हती. त्यामुळे पती अरविंद शिंदे यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. पण, ती कामावर आली नसल्याचे समजातच गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

दुसरीकडे बुटीबोरी पोलीस हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न केला. हा मृतदेह शारदाशी मिळताजुळता होता. पोलिसांनी व्हेरायटी चौकातील स्मार्ट सिटीचे कॅमेरे तपासले असता ती एका लाल रंगाच्या व्हॅगनआर कारमधून उतरल्याचे दिसले. त्यानंतर ती सिनेमागृहात गेली व काही वेळात पुन्हा परतली. त्यानंतर कारमध्ये बसली. कार पुढे वर्धा मार्गावर हॉटेल प्राईडपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. पोलिसांनी कारचा क्रमांक मिळवून मालकाचा शोध घेतला असता ती कार विजय एकनाथ वानी यांच्या मालकीची असून ती त्यांचा भाऊ वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

 

ताज्या बातम्या