Thu. Aug 6th, 2020

शबनम न्यूज : पुणे (दि. ०७) – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेचा प्रारंभ शुक्रवारी येथे झाला. परिषदेचे मुख्य सूत्र न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असे असून देशांतर्गत सुरक्षेवरही परिषदेत चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या परिषदेत शुक्रवारी दुपारी मार्गदर्शन केले. परिषदेत शनिवारी (७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असून शुक्रवारी रात्री त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुपारच्या सत्रात शहा यांनी देशभरातील पोलीस महासंचालकांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने एका पुस्तिकेचे प्रकाशनही शहा यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी (९ डिसेंबर) होईल. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!