WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

व्हाट्सअँप मध्ये येणार आता नवे फीचर्स

शबनम न्यूज : मुंबई (दि. १९) – ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. WhatsApp आता लवकरच तुम्हाला मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट देणार आहे. WABetainfo या ब्लॉगच्या रिपोर्टनुसार व्हाट्सअप कंपनी या संबंधी टेस्टिंग करत असल्याचं सांगितलं आहे. याच ब्लॉगच्या रिपोर्टनुसार आता WhatsApp Beta व्हर्जन 2.19.120.20 मध्ये #WhatsApp मल्टी डिव्हाइस सपोर्ट असणार आहे.

या नवीन मल्टी डिव्हाइस सपोर्ट मधून आता वेगवेगळ्या मोबाइलवरून तुम्ही तुमचं WhatsApp अकाउंट लॉग इन करू शकणार आहात. सध्या फक्त एकाच फोनमध्ये तुम्ही WhatsApp वापरू शकतात. WhatsApp Web च्या माध्यमातून तुम्ही मोबाइल सोबतच तुमच्या कॉम्प्युटरवर देखील WhatsApp वापरू शकतायत. मात्र आता फेसबुक किंवा ट्विटरसारखं तुम्ही वेगवेगळ्या मोबाइलमधून आता तुम्ही WhatsApp वापरू शकतात.

 

 

WhatsApp च्या मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट सोबतच ग्राहक WhatsApp च्या डार्क मोड ची देखील वाट पाहतायत. मात्र, याबद्दल अजून काहीही माहिती समोर येताना दिसत नाहीये. मात्र याबाबतचे स्क्रीनशॉट लिक झाल्याने आता या फीचर्सची उत्सुकता वाढलीये.

 

ताज्या बातम्या