Tue. May 26th, 2020

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना व महावितरण अधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यांनी शुक्रवार दि.०८.११.२०१९ रोजी महा वितरणच्या गणेशखिंड कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार यांच्या सोबत बैठक घेतली व पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज विषयक समस्यांबाबत व खंडित वीज पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा केली .

            या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे .संचालक श्री.नवनाथ वायाळ ,श्री.प्रमोद राणे ,श्री,विजय भिलवडे ,श्री.सुर्यकांत पेटकर ,श्री.विकास नाईकरे ,श्री.येवले ,श्री.भट व अनेक उद्योजक उपस्थित होते .,तसेच महावितरणचे  अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार,भोसरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री.राहुल गवारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.बी.बी.भरणे ,श्री.उमेश दवडे ,श्री .चौधरी इ.अधिकारी  उपस्थित होते .

      या वेळी संघटनेतर्फे अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार यांना पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज विषयक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले ,सदर निवेदनात पुढील मुद्द्याचा समावेश होता.

१.देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन टी पूर्ण करावी .

२.वीज वाहिन्यास अडथला ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तातडीने काढाव्या .

३.मोडकळीस आलेले फिडर फिलर बदलावेत .

४.फिडर पिलरची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी करावी .

५.केबल दोष शोधणारे वाहन पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे .

६.केबल जोडणारी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी..

७.डी.पी.डी.सी.च्या योजनेखाली येणारे रोहित्र बसवावेत.

८.भोसरी सब स्टेशन -२ पेठ क्रमांक ७ मधील फिडर क्रमांक १ साठी बे ब्रेकर बसवावेत .

९.L.T., H.T. केबल उपलब्ध करून द्यावेत .

१०.H.R.C. FUJ , FUJ WIRE उपलब्ध करून द्यावेत.

११.मोई फिडरला  जोडलेला कुदळवाडी ,चिखली औद्योगिक परिसर TATA फिडर ला जोडावा .

१२.थ्री फेज मीटर उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना अंदाजे वीज बिल दिले जाते त्यामुळे उद्योगांना आर्थिक भुर्दंड  बसतो . मीटर उपलब्ध करावेत .

या वेळी बोलताना अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार यांनी विभागवार वीज वाहिनीला अडथला ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले  ,डीपी. मधील फुज वायर व इतर साहित्य व्यवस्थित बसवण्याचे ,तसेच जादा क्षमतेचे रोहित बसवण्याचे आदेश दिले .फिडर पिल्रची उंची वाढवणे ,पिलर फिडर क्लिपिंग करणे आदि.बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या . फुज वायर योग्य प्रमानाचीच वापरावी जास्त जाडे बार वापरू नये अशी ताकीद दिली .औद्योगिक परिसरात देखभाल दुरुस्ती साठी मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार यांनी या वेळी दिले . मोई फिडरला  जोडलेला कुदळवाडी ,चिखली औद्योगिक परिसर TATA फिडरला येत्या १० दिवसात जोडण्यात येईल .टी block मधील प्रियदर्शनी औद्योगिक वसाहतीत जादा क्षमतेचे रोहित्र बसवण्यात येईल .तसेच ज्याचे वीज पुरवठा बंद करावयाचा आहे त्याचाच बंद झाला पाहिजे त्याचा इतर उद्योगांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना अधीक्षक अभियंता श्री.पंकज तगलपल्लेवार यांनी  यावेळी केली

 

ताज्या बातम्या