Tue. May 26th, 2020

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन  

SHABNAM NEWS – 8 NOV.
पुणे ः
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत’रागभावरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,८ नोव्हेंबर २०१९ सायं ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम  होणार आहे. ‘रागभावरंग’ ही शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी व हिंदी नाटयगीते, भावगीते,भक्ती गीते, लावणी, निसर्ग गीत, चित्रपट गीतांची मैफिल  आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात डॉ. सौ. अनघा राजवाडे, नीरज केतकर व चंद्रकांत निगडे(गायन),उदय शहापूरकर(हार्मोनियम),अशोक मोरे(तबला),रमेश मंगळूरकर(तालवाद्य),प्राजक्ता मांडके(निवेदन) हे सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९५ वा कार्यक्रम  आहे

 

ताज्या बातम्या