Tue. May 26th, 2020

शहरातील पाणी कपात रद्द करावा – सचिन चिखले

शबनम न्युज : – दि.४ पिंपरी चिंचवड  शहरातील पाणी कपात रद्द करावा असे निवेदन मनसेचे शहरअध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपा आयुक्तांना दिले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि  पिंपरी चिंचवड शहर व मावळ मधील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील 100 टक्के भरले आहे. मागील वर्षी आजमितीला धरणात 88 टक्के पाणीसाठा होता. मागील वेळेपेक्षा यावेळी धरणात 11. 50 टक्के पाणीसाठा अधिक आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना अजून देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरातील काही ठिकाणी पाण्याच्या बाबत बोंबाबोंब सुरू आहे. नागरिकांची नैराश्याची भावना आहे, काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर अध्याप देखील सुरू आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्वरित शहरावरील पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना सुरळीत नियोजित व मुबलक पाणीपुरवठा करावा या वेळी सचिन चिखले,सोबत रुपेश पटेकर,सिमाताई बेलापुरकर,रवीदादादा जाधव,स्वप्निल महांगर,मनोज लांडगे, रोहित काळभोर,प्रतिक शिंदे, गणेश उज्जेन्नकर उपस्थित होते

 

ताज्या बातम्या