WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

चार महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग धरून वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा खून

शबनम न्यूज : पुणे (दि. ०४) – चार महिन्यापूर्वी मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला या वाराच्या कारणावरून एका तरूणाने वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. हि घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास खराबवाडी येथे घडली. विजय लक्ष्मण गायकवाड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांची पत्नी सुनिता विजय गायकवाड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेश लक्ष्मण घोलप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यशाचे मयत विजय यांचा मुलगा दीपक याच्याशी किरकोळ कारणावरून मागील चार महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग धरून आरोप मुकेशने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विजय यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला याबाबत चाकण पोलीस अधिक तपास करीत आहे.

 

ताज्या बातम्या