शिवाजीनगर मतदार संघामधून सिद्धार्थ शिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

SHABNAM NEWS : PUNE (DATE. 03) – भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज शिवाजीनगर मतदार संघामधून आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू कलादालन येथे निवडणूक अधिकारी अस्मिता मोरे यांच्याकडे शिरोळे यांनी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्याआधी शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिर येथून कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी मिरवणुक काढली. पुणे शहराचा माजी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विजय काळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शिवाजीनगर मधील नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे , नगरसेवक मधुकर मुसळे, आदित्य माळवे, विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांबरोबरच शिवसेनेचे शिवाजीनगर विभाग प्रमुख राहूल शिरोळे उपविभाग प्रमुख मंगेश खेडेकर,माजी उपविभाग प्रमुख राजेश मांजरे आदी या वेळी उपस्थित होते.