शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी पीएमपीएमएल बसफेरीने येऊन अर्ज भरला !

SHABNAM NEWS : PUNE (DATE. 03) – आम आदमी पक्षाचे पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवार संदीप सोनवणे ३ ऑकटोबर रोजी कार्यकर्त्यांसमवेत  पीएमपीएमएल बसफेरीने येऊन उमेदवारी अर्ज भरला !
 प्रचारात सुरवातीपासूनच आम आदमी असलेल्या मतदारांशी,त्यांच्या समस्यांशी नाते जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असून ३ तारखेला सकाळी १० वाजता अपर इंदिरानगर येथून कुटुंबीय ,कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत संदीप सोनवणे यांची बसफेरी निघाली .त्यासाठी आवश्यक परवानगी त्यांनी घेतल्या होत्या.
अपर इंदिरानगर ,शंकर महाराज मठ ,सातारा रस्ता ,सारसबाग मार्गे सणस मैदानापर्यंत ही बसफेरी मतदारांशी संपर्क करीत पोहोचली ,तेव्हा त्यांची बसफेरीतील छबी टिपायला प्रसारमाध्यम प्रतिनिधींची एकच गर्दी झाली !  पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्ज भरण्याची सुविधा सणस मैदान कार्यालयात असल्याने तेथे अर्ज भरला गेला 
‘ सामान्यांबरोबर राहणारा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावे, मी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करेन”, असे संदीप सोनवणे यांनी सांगितले 
 
आम आदमी कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा 
 
सणस मैदानाच्या प्रवेशद्वारावर भाजपा खासदार गिरीश बापट यांनी कार्य्रकर्त्यांना संबोधित केल्याचा दाखला पोलिसांना देत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलायला रोखू  नये  म्हणून रुद्रावतार धारण केला . तेव्हा उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ उडाली ! आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या ,तेव्हा भाजप कार्यकर्त्याचेही लक्ष वेधले गेले . दोन्ही गट समोरासमोर असल्याने अखेर समजूत काढून पोलिसांनी कार्यकर्त्याना शांत केले . 
 

कान्हे व लोणावळा येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय लवकरच उभारणार; आमदार सुनील शेळके यांची माहिती

‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न

19वा शनिवारवाडा नृत्य महोत्सव दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार!

पत्रकार प्रतापसिंह राजपूत यांचा सन्मान

सभागृह नेते पदी नामदेव ढाके विराजमान

मराठी चित्रपट ‘बोनस’चा ट्रेलर प्रदर्शित

ताज्या बातम्या

कान्हे व लोणावळा येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय लवकरच उभारणार; आमदार सुनील शेळके यांची माहिती

‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न

19वा शनिवारवाडा नृत्य महोत्सव दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार!

पत्रकार प्रतापसिंह राजपूत यांचा सन्मान

सभागृह नेते पदी नामदेव ढाके विराजमान