Sun. Jul 12th, 2020

SHABNAM NEWS : SANGLI (DATE. 15) – महापुराचा पशुधनाला मोठा फटका बसला आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. दगावलेल्या जनावरांचे पंचनामे सुरू आहेत. दि. 14 ऑगस्टअखेर दगावलेले पशुधन, कोंबड्यांची संख्या 8 हजार 53 पर्यंत गेली आहेे. जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी ही माहिती दिली.

पूरबाधित गावांमध्ये पशुधनास पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडील 51 आणि अन्य यंत्रणांकडून उपलब्ध करून देण्यात आलेले 21 असे एकूण 72 पशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक तैनात आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात चोवीस तास साथ नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. पशुसंवर्धन विभागाकडे 57 लाख रुपयांची औषधे उपलब्ध झाली आहेत. साथीचे आजार फैलावणार नाहीत, याची दक्षता व उपाययोजना सुरू आहेत. पूरबाधित गावांमध्ये 3 हजारांहून अधिक जनावरांवर उपचार केले आहेत. 5 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. पराग यांनी दिली.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!