थेरगाव सोशल फाउंडेशनचे प्लास्मा दान करण्याचे आवाहन
शबनम न्युज : १५ सप्टेंबर (प्रतिनिधी) पिंपरी :-राज्य सरकारने प्लास्मा थेरपी ला मान्यता दिल्यानंतर थेरगाव सोशल फाऊंडेशन ने पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात पहिल्यांदा या थेरपी ची माहीती घेऊन प्लास्मादान बाबत जनजागृती सुरु केली व १ ॲागस्ट
रोजी पहिल्यांदा एकाच दिवशी १० डोनर कडुन प्लास्मादान करुन घेण्यात आला व यानंतर आजपर्यंत अनेक कोरोना बाधित लोकांना समुपदेशन करुन त्यांना प्लास्मादान करण्यास लावले.
या चळवळीच्या माध्यामातुन आजपर्यंत ३५०+ पेक्षा अधिक कोरोना रुग्नांना थेरगाव सोशल फाऊंडेशन प्लास्मा देण्यात आला यामध्ये YCM ब्लड रक्तपेठी तसेच संजिवनी रक्तपेठी भोसरी यांची मोलाची मदत केली, २८ दिवस पुर्ण झालेल्या कोरोना बधितांना आम्ही थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे कि, की आपण ही प्लास्मा दान करण्यास पुढाकार घ्यावा व काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करावा.
शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.