बाजारपेठेत ज्वारी, मसूर यांसह खाद्यतेलाचे दर वाढले
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शबनम न्युज : कोल्हापूर (दि. ०८) – या आठवड्यात बाजारपेठेत ज्वारी, मसूर यांसह खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी तर ज्वारीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली. बेळगाव मसूर प्रतिकिलो दहा रुपयांनी महागल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
बाजारात बार्शी शाळूच्या दरात प्रतवारीनुसार प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली. एक नंबर प्रतिचा शाळू प्रतिकिलो ५२ रुपयांवरून ५४ रुपये झाला आहे. गहू, बाजरी, नाचणीचे दर कायम आहे. कडधान्यामध्ये बेळगाव मसूरच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली. हा दर १५० रुपयांवर पोचला आहे. मूग, तूरडाळ, मसूरडाळ, मटकी, हरभरा डाळ या कडधान्याचे दर स्थिर आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.