राष्ट्रवादी काँग्रेस डाँक्टर सेल च्या वतीने ‘ वॉक फॉर हेल्थ’ चे १२ डिसेंबर रोजी आयोजन
शबनम न्युज : पुणे (दि. ०८) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त दि.12 डिसेंबर 2019 , गुरूवार रोजी राज्यभर ‘ वॉक फॉर हेल्थ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी ही माहिती दिली.
या दिवशी उद्याने, टेकडया, मैदाने अशा ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या आरोग्य प्रेमींचे राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल चे पदाधिकारी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करणार आहेत.मोठे कार्यक्रम टाळून राज्यातील अवकाळी पावसाने खचलेल्या शेतकरी बांधवांना मदत केली जाणार आहे.
या उपक्रमाच्या तयारीसाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलची बैठक पुणे पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी डाॅ सुनिल जगताप ,डाॅ हेमंत तुसे ,डाॅ राजेश पवार ,डाॅ सिद्धार्थ जाधव ,डाॅ अजितसिंह पाटील ,डाॅ सुनिल होनराव ,डाॅ राजेंद्र जगताप ,डाॅ गणेश निंबाळकर ,डाॅ लालासाहेब गायकवाड ,डाॅ विजय वारद ,डाॅ.विश्वंभर हुंडेकर ,डाॅ परशुराम सूर्यवंशी ,डाॅ प्रताप ठुबे ,डाॅ ,शशिकांत कदम ,डाॅ सुजाता बरगाळे ,डाॅ सुलक्षणा जगताप ,डाॅ अर्चना पिरापघोळ,डाॅ गिरिश होनराव ,डाॅ हरिष ऊंडे ,डाॅ स्नेहलता ऊंडे ,डाॅ अमोल ससे,सौ.अश्विनी शेवाळे उपस्थित होते.