आगामी मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविणार -आमदार सुनील शेळके
शबनम न्यूज , वडगाव मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील देहूरोड कॅन्टोंमेट बोर्ड, लोणावळा नगरपरिषद, तळेगाव नगरपरिषद, मावळ पंचायत समिती व ग्रामपंचायती ह्या आगामी येणार्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर लढवणार असल्याची घोषणा आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आरोग्य मोहिम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगाव येथील जिल्हा बॅकेच्या हाॅल मध्ये बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कोरोना व पक्ष संघटने विषयी चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, किशोर भेगडे, गणेशराव खांडगे, गणेश काकडे, सचिन घोटकुले, दिपक हुलावळे, सुभाष जाधव, वैशाली दाभाडे महीला अध्यक्षा सुवर्णा राऊत, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, अशोक घारे,तानाजी दाभाडे, कुसुम काशीकर, सुनिता काळोखे, मंजुश्री वाघ, शितल हगवणे, अंकूश आंबेकर, कृष्णा दाभोळे, प्रविण झेंडे, चंद्रजित वाघमारे, सुनील दाभाडे, नवनाथ चोपडे, मोहोळ यांच्यासह लोणावळा, वडगाव, तळेगाव, देहुरोड या सर्व विभागाचे अध्यक्ष याबैठकीला उपस्थित होते.