राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले टोपे कुटुंबियांचे सांत्वन
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) मुंबई :राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षांच्या होत्या. राजेश टोपे यांच्या आईच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावूक पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagramसार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबियांचे सांत्वन करतांना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. माझे दिवंगत सहकारी व मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली. माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो’ अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे.