पुण्यामध्ये एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) पुणे :-कौटुंबिक वादातून एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुडमध्ये घडली. भाग्यश्री अमेय पाटील (वय ३०, रा. पश्चिमानगर, कोथरुड) असे या महिलेचे नाव आहे.
भाग्यश्री वास्तुविशारद होत्या. त्यांचे पती अमेय संगणक अभियंता आहेत. त्यांचा ३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.लॉकडाऊनच्या काळात दोघेही घरीच होते.दोघांमध्ये बुधवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला.त्यानंतर भाग्यश्री खोलीत निघून गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजता आतून बंद केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळीही भाग्यश्री यांनी दरवाजा उघडला नाही. अमेय यांनी दरवाजा वाजविला तरी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर भाग्यश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.