स्व. जावेद शेख यांना महापौरांनी वाहिली श्रद्धांजली
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) पिंपरी :-लोकांसाठी झटणारा एक अभ्यासू नगरसेवक अशी ओळख असणारे विद्यमान नगरसदस्य जावेद शेख यांच्या निधनाने धक्का बसला असून सभागृहामध्ये एखादे काम झालेच पाहिजे असा आग्रह करणारा नेता आपल्याला सोडून निघून गेला असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दिवंगत विद्यमान नगरसदस्य जावेद शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे ,स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.