लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्यास महापौरांच्या हस्ते अभिवादन
शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) पिंपरी :– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
..