कोरोना विषाणू च्या लढ्यात मावळ मधील मुस्लिम बांधवांनी घेतला एक महत्त्वाचा निर्णय
कोरोना विषाणू संदर्भात मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी
शबनम न्युज : ०१ ऑगस्ट (प्रतिबिधी) मावळ :- संपूर्ण जगभरात मागील पाच सहा महिन्यापासून कोरोना विषाणू शी अनेक प्रकारे शासन-प्रशासन राज्यकर्ते लढा देत आहेत. कोरोना चे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुस्लीम बांधवांनी एक आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणू च्या लढ्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मावळमध्ये कोरोना विषाणू चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, या विषाणूचा संसर्ग रोखण्या साठी शासन प्रशासन डॉक्टर्स पोलीस सफाई कर्मचारी व इतर सामाजिक यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून या विषाणू विरोधात लढा देत आहेत या सर्व परिस्थिती च्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील वडगाव या गावात असलेल्या जामा मस्जिद चे सभागृह क्वारटांईन सेंटर उभारण्या करिता शासनाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
आज मुस्लिम बांधवांचा (ईद उल अजहा) बकरी ईद मोठ्या उत्साहात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरा होत आहे या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांच्या बैठकीत एक मताने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. या जामा मस्जिद च्या सभागृहाची क्षमता अंदाजे 80 ते 100 बेड्स इतकी आहे शासनाने हे सभागृह रुग्णांच्या उपचारासाठी वापरात आणावे यासंदर्भात निवेदन मावळ मतदार संघाचे आमदार सुनील उर्फ अण्णा शेळके व निवासी नायब तहसीलदार आर चाटे यांना देण्यात आले.
या वेळी हाजी इब्राहिम शेख, अब्दुल शेख, रा.काँ. पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद, रशिद शेख, युनुस मोमीन, सलीम तांबोळी, मौलाना मुजिब व जावेद तांबोळी आदी उपस्थीत होते. शासनाने हे जामा मस्जिद चे सभागृह रुग्णांच्या उपचारासाठी वापरात आणावे असे निवेदनाद्वारे मुस्लिम बांधवांनी विनंती केली आहे.