रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने नगरसेवक स्वर्गीय जावेद शेख यांना श्रद्धांजली
शबनम न्यूज : पिंपरी , ०१ ऑग. (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे काल दुःखद निधन झाले त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड शहरातील एक कार्यक्षम व्यक्तिमत्व हरपला असल्याची भावना पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्था रिलीफ सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष समीर मुल्ला यांनी व्यक्त केली त्यांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवड शहराचे झालेले नुकसान हे कधीही भरून न येणारे असल्याचे हि त्यांनी श्रद्धांजली देताना आपली भावना व्यक्त केली.रिलीफ सोशल फाउंडेशन चे उपाध्यक्ष समीर गफुर शेख, कार्याध्यक्ष नूर मेहबूब शेख ,सेक्रेटरी इमरान हारुन शेख, उपसेक्रेटरी विकास जानकर, खजिनदार आरिफ शेख, उप खजिनदार फिरोज शेख तसेच सदस्य मुजफ्फर मेहबूब शेख ,समीर शेख, प्रवीण राजपूत, इम्रान मुल्ला यांनी ही स्वर्गीय जावेद शेख यांना श्रद्धांजली दिली.
…..