समाजवादी पार्टी पुणे शहराच्यावतीने उत्तर भारतीय बांधवांचा महामेळावा उत्साहात संपन्न
शबनम न्युज : – समाजवादी पार्टी पुणे शहराच्यावतीने भवानी पेठमधील लक्ष्मी बाजारमध्ये उत्तर भारतीय बांधवांचा महामेळावा उत्साहात संपन्न झाला . या महामेळाव्याचे उदघाट्न समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष , आमदार अबू असीम आझमी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बहादूर यादव , महासचिव झुल्फिकार आझमी , महासचिव दिनेशकुमार यादव , मुंबई महासचिव रमाशंकर तिवारी , अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टियुटचे संचालक डॉ एल आर यादव , समाजवादी पार्टी युवजन सभाचे राष्ट्रीय सचिव रतन सोनकर , पुणे शहर अध्यक्ष दिनेश यादव , उपाध्यक्ष रामधनी यादव , महासचिव पवन यादव , पुणे शहर उपाध्यक्ष राधेशाम यादव , सचिव अशोक यादव , पर्वती विधानसभा अध्यक्ष विजय बहाद्दूर यादव , हडपसर विधानसभा अध्यक्ष कैलास बळीराम यादव , खडकवासला विधानसभा अध्यक्ष गोविंद यादव , वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष लालबाबु यादव , पुणे शहर प्रवक्ते अध्याप्रसाद यादव , यादव समाज चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गुलाबदार यादव , अध्यक्ष तहसीलदार यादव , कार्याध्यक्ष ओमप्रकाश यादव , सदस्य रघुनाथ यादव आदी मान्यवर व पार्टीचे पदाधिकारी व कार्य्रकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी उत्तर भारतीय बांधव आपण सर्वानी एकत्रित आले पाहिजे , तरच आपल्याला मान सन्मान मिळेल . शहराची नावे बदलून येथील राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजत आहे . माणसाला महत्व न देता गाय बैलाला महत्व दिले जात आहे . हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे . नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वसनें अद्याप पूर्ण केलेली नाहीत . यासाठी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे या सरकारला चितपट केल्याशिवाय राहणार नाही . समाजवादी पार्टी उपेक्षित ,शेतकरी , कामगार , पीडित बांधवाना न्याय देण्याचे काम करणार आहे . हिंदी भाषा हि आमची आई आहे तर मराठी भाषा हि आमची मावशी आहे . त्यामुळे आम्ही सर्वाना न्याय हक्क मिळवून देण्याचे काम समाजवादी पार्टीचे कार्य्रकर्ते काम करणार आहे .
या महामेळाव्याचे सूत्रसंचालन अरविंद यादव यांनी केले तर आभार समाजवादी पार्टी पुणे शहर अध्यक्ष दिनेश यादव यांनी मानले . या महामेळ्यामध्ये रावेत भागातील भारतीय जनता पार्टीचे सचिव अमित यादव व भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी पिपरी काळेवाडी अध्यक्षा अमृता यादव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केला .