#CRIME : मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चार अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात
शबनम न्युज : १२ जुलै (प्रतिनिधी) वडगाव शेरी :- रस्त्याने पायी अथवा दुचाकीने जाणाऱ्या नागरिकाला हेरून त्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चार अल्पवयीन मुलांच्या टोळीला चंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे तब्बल 13 मोबाईल हस्तगत केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनगर परिसरातील एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना चंदनगर पोलिसांना या चार अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली असता, पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांनी अशाप्रकारे 13 मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले. हे सर्व मोबाईल त्यांनी चंदनगर, खराडी आणि वडगाव शेरी या परिसरातून चोरल्याचे सांगितले.
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.