#CORONAVIRUS : जिल्हात आणखी २० जण पॉझिटिव्ह
शबनम न्युज : १२ जुलै (प्रतिनिधी) अकोला :- कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला जिल्ह्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवार, १२ जुलै रोजी जिल्हाभरात आणखी २० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १८७९ वर गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रविवारी सकाळी १३८जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ११८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा