Mon. Jul 27th, 2020

#CORONAVIRUS : या विशिष्ट वयोगटातील बाधितांची मृत्यू संख्या अधिक

शबनम न्युज : अकोला (दि. २९ मे ) – कोविड बाधितांचे जिल्ह्यात जे मृत्यू झालेत त्यात विशिष्ट वयोगटातील बाधितांची मृत्यू संख्या अधिक आहे. या सोबतच मृत्यू झालेल्यांमध्ये ज्या रुग्णांना पूर्वीचे आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब वा श्वसनाचे अन्य आजार आहेत अशांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्ह्यात २७ मेपर्यंत २७ मृत्यू (५५ टक्के डेथ रेड) झाले व एक आत्महत्या आहे. मयत झालेल्या पैकी सर्वाधिक १६ रुग्ण हे ५० ते ७० या वयोगटातील आहे. तसेच ७ रुग्ण हे ३० ते ५० वर्ष वयोगट व ४ रुग्ण हे ७ ० वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे होते. २७ पैकी १३ रुग्ण हया स्त्रिया व १४ रुग्ण पुरुष आहेत. हे सर्व २१ रुग्ण हे कंटेन्टमेंट झोन मधुन आले होते. मयत रुग्णापैकी ३ रुग्ण हे मयत झाल्यानंतर(ब्रॉट डेड) रुग्णालयात आणले गेले. एकुण ७ रुग्णांचा मृत्यु रुग्णालयात आणल्या नंतर २४ तासाच्या आत उपचारा दरम्यान झाला. नऊ रुग्णांचा मृत्यू २४ ते ७२ तासांच्या उपचार दरम्यान आणि आठ रुग्णांचा मृत्यु ७२ तासानंतर उपचारा दरम्यान झाला. २४ रुग्णामध्ये सोबत गंभीर आजार (मधूमेह, उच्च रक्तदाब,श्वसनाचे आजार इ. ) असल्याचे आढळून आले.

 

जे रुग्ण ५० ते ७० वयोगटातील आहे व ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब श्वसनाचे आजार आहे, असे व्यक्ती हे कोविड १९ या विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात येऊन मयत झाले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अशा नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या या आजाराची नियमीत तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा व दमा ,ताप, खोकला ,स्नायुदुखी, डोके दुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे कोविड १९ या आजाराच्या तपासणीकरीता व समुपदेशनकरिता संपर्क साधावा.

 

विभागात कोरोना बाधित 84 हजार 455 रुग्ण

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदन सादर

श्रीरामपूर मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले दोन आरोपी फरार

प्रवीण दरेकर यांनी पीडिता कुटुंबाला व पोलीस आयुक्तलयाला दिली भेट

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२० पोलीस कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

विभागात कोरोना बाधित 84 हजार 455 रुग्ण

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदन सादर

श्रीरामपूर मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले दोन आरोपी फरार

प्रवीण दरेकर यांनी पीडिता कुटुंबाला व पोलीस आयुक्तलयाला दिली भेट

error: Content is protected !!