द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला दोन हजार मास्क भेट
शबनम न्यूज २८ मे : पिंपरी चिंचवड : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला दोन हजार “एन 19” मास्क भेट देण्यात आले. लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश पेठे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बिजलीनगर(चिंचवड) येथे आज दि. 28 रोजी झालेल्या कार्यक्रमात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) अजित पवार यांनी मास्क स्वीकारले. यावेळी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सनेर पाटील, श्रद्धा पेठे, सुनील जाधव, हिरामण गवई, प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र कोळी, विजय अग्रवाल, शैलेश आपटे, श्री. सावंत, विक्रम माने, अनिल दंडादे, उपेंद्र खांबेटे, रवी सातपुते यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्लबच्या वतीने वर्षभरात अन्नदान, नेत्रदान, चाईल्डहूड, डायबेटिस, पर्यावरण आदी विषयांवर काम केले जाते. सध्या देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्लब च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून याचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार मास्क उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाबद्दल अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकारयांचे कौतुक केले. तसेच, लायन्स क्लब प्रमाणे इतर सामाजिक संस्था देखील कोरोनाचा पराभव करण्यासाठी सरसावल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, गेल्या दोन अडीच महिन्यापासून शहरातील कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी महापालिकास्तरावर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शहरातील लायन्स क्लब सारख्या सामाजिक संस्था पुढाकार घेत असून त्यांचे कार्य अभिमानस्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जे कुटुंब गरजू गरीब कामगार मजूर आहेत अशा कुटुंबांसाठी रोज दोन वेळचे जेवण देण्याचे कार्य नगरसेविका मनिषा ताई पवार व प्रमोद पवार यांच्या नियोजनात होत आहे आज जेवण वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने हा शेवटचा दिवस गोड अन्नपदार्थ देऊन करावा या उद्देशाने भाजी पोळी भात बरोबरच गोड शिरा ही यावेळी वाटप करण्यात आला सदरचे आज अन्न वाटप पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आऊट मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मागील दोन महिन्यापासून या सामाजिक कार्यात त्यांचा हातभार लागला आहे अशा प्रमोद पवार यांच्या सहकाऱ्यांचा ही सन्मान करण्यात आला.