#CORONAVIRUS : औरंगाबाद कोरोनाग्रस्त ; वाढली चिंता
शबनम न्युज : औरंगाबाद (दि. २८ मे ) – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात आज, गुरूवारी ३५ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या १,३९७ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये १४ महिला आणि २१ पुरुषांचा समावेश आहे.
मकसूद कॉलनी, इंदिरानगर बायजीपुरा, हुसेन कॉलनी, माणिकनगर गारखेडा, रोशनगेट, रहिमनगर परिसरातील सहा जणांचे २६ व २७ मे रोजी कोरोना आणि इतर आजाराने बळी गेले. त्यामुळे औरंगाबादमध्ये एकूण मृत्यू ६५ झाले आहेत.