#PUNE : पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरितमजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय
शबनम न्युज : पुणे (दि. २८ मे ) -सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 24 कॅम्प, कामगार विभागामार्फत 6 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 3 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 33 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 हजार 105 स्थलांतरित मजूर असून 3 हजार 999 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
.