पोलीस आयुक्तांकडून पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या पोलिसांचा गौरव.
शबनम न्यूज ६ मे (पिंपरी चिंचवड ) –पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या पोलिसांचा गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालयात सोशल डिस्टन्स पाळून पार पडलेल्या गौरव सोहळ्यासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ आदि उपस्थित होते. यांनीही सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे महासंचालक पदक मिळाल्याबद्दल कौतुक केले.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, तसेच आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र राठोड, युनिट चारचे पोलीस हवालदार धर्मराज आवटे, महिला सहाय्यक कक्ष पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड, गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र शेटे, चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अहमद शेख, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दिपमाला लोहकरे, युनिट पाच पोलीस नाईक दत्तात्रय बनसुडे, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप होळकर यांना हे पदक जाहीर झाले आहे. सेवेत सतत १५ वर्ष उत्तम सेवाभिलेख असल्याबाबत यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.