Sun. May 10th, 2020

पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार 574 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

शबनम न्यूज ६ मे (पुणे ) – पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 287 बाधीत रुग्ण असून 608 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 92 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 145 बाधीत रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 12 लाख 96 हजार 465 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये महापालिकेच्यावतीने मोफत जेवणा साठी किचन चालू करावे — नगरसेविका अनुराधा गोरखे यांची आयुक्त यांच्याकडे मागणी

करण दादा रामपाल युवामंच वतीने गरजू कुटुंबाना मदत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नॉन कनटेन्मेंट झोन मधील उद्योग सुरु करण्यास येत्या आठवड्यात परवानगी देऊ -आयुक्त श्रावण हार्डीकर

पिंपळे सौदागर मध्ये सोशल डिस्टेससिंग चे पालन करीत गरजूना दोन वेळ चे जेवण – निर्मला कुटे

पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे वतीने कोरोना करिता महानगरपालिकेस ५ टन तांदुळ आणि १ टन तूरडाळ

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणिपरिवहन मंत्र्यांना साकडे

ताज्या बातम्या