WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?
Thu. Feb 20th, 2020

महापौर चषक एकांकिका स्पर्धेत थेरगाव विद्यालय विजेता

शबनम न्युज : पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) –  महापौर चषक टिन 20 शालेय एकांकिका स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाने 84 गुण प्राप्त करीत आठवी ते दहावी गटात विजेतेपद प्राप्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सुरू आहे. या वेळी क्रीडा पर्यवेक्षिका अनिता केदारी, वैजयंती सदाफुले, वैशाली जाधव, रोनीत आव्हाड आदी उपस्थित होते. परिक्षक म्हणून अभिनेत्री कल्पना भावसार यांनी काम पाहिले.
स्पर्धेत थेरगाव विद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेला प्रथम स्थान मिळविले. काळभोरनगर विद्यालयाने 83 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. सीएमई स्कूल 81 गुण मिळवित तिसरे स्थान मिळविले. न्यू इंग्लिश स्कूल (67 गुण) आणि पिंपळे सौदागर विद्यालयाने (66 गुण) उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
इतर निकाल पुढीलप्रमाणे आहेत 
पहिली ते चौथी गट : 1) सिटी प्राईड स्कूल, 2) शिवभूमी विद्यालय, 3) भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय. उत्तेजनार्थ : पिंपळे गुरव प्राथमिक शाळा.
पाचवी ते सातवी गट : 1) विद्या विनय निकेतन प्राथमिक शाळा, 2) सरस्वती माध्यमि क विद्यालय, 3) शिवभूमी विद्यालय. उत्तेजनार्थ : जिजामाता माध्यमिक विद्यालय, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा.
 

ताज्या बातम्या