Sat. Sep 19th, 2020

महापालिकेच्या हस्तांतरित जागेवरील अनधिकृत पत्राशेड, टप-या हटविल्या

शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२०) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाकड येथील महापालिकेच्या हस्तांतरित जागेवरील अनधिकृत पत्राशेड, टप-या हटविल्या आहेत. तसेच सीमाभींत, ओट्यावर आज (शुक्रवारी) कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 25, 26 येथील दत्तमंदिर, वाकड रस्ता येथे अतिक्रमण झाले होते. 45 मीटर रस्ता रुंदीकरणाने बाधित महापालिकेस हस्तांतरित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टप-या थाटल्या होत्या. अतिक्रमण विभागाने या पत्राशेड, टप-यांवर धडक कारवाई केली. 20588.82 चौरस फुट असलेले चार पत्राशेड, 12 ओट्टा, तीन टपरी, एक गेट, 25 बोर्ड, आठ सीमाभिंतीवर कारवाई करण्यात आली.

उपअभिंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने कारवाई केली. तीन जेसीबी, एक ट्रक, 18 महापालिका कर्मचा-यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!