Sun. Aug 9th, 2020

इंद्रायणी थडी करिता भोसरीकर सज्ज

 इंद्रायणी थडी संवाद : निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे पण, भोसरीत पुजा महेश लांडगे यांचा ‘जनसंपर्क’

भोसरी मतदार संघात इंद्रायणी थडी जत्रेचा माहोल
– पुजा लांडगे, साक्षी लांडगे यांची जोरदार तयारी

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ जानेवारी २०२०) प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा भोसरीत भरवली जात आहे. ही पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ही जत्रा भरवली जात आहे. मात्र, या ‘बिग बजेट’ जत्रेच्या माध्यमातून आ. लांडगे यांच्या सौभाग्यवती पुजा महेश लांडगे यांनी आपला ‘जनसंपर्क’ चांगलाच वाढवला आहे. ‘हळदी-कुंकू’ समारंभाच्या निमित्ताने पुजा वहिनींनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गावजत्रा मैदानावर दि.३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी २०२० अशी चार दिवस इंद्रायणी थडी जत्रा भरणार आहे. या महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याबाबत चळवळ उभारली जावी, असा आ. लांडगे यांचा संकल्प आहे.
भोसरी आणि परिसरात शिवांजली सखी मंचचे काम विस्तारले आहे. या मंचच्या प्रमुख म्हणून आ. लांडगे यांच्या सौभाग्यवती पुजा लांडगे कार्यरत आहेत.पुण्यातील भीमथडीच्या धर्तीवर भोसरी मतदार संघातील महिला बचतगट, महिला संस्था, संघटनांना सहभागी होता यावे. याकरिता भोसरीत गतवर्षीपासून ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरवण्यात येते. गतवर्षी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता. यावर्षीही जत्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास संयोजकांना वाटतो.
जत्रेत शिवांजली सखी मंच आणि त्यांच्या सदस्यांनी मोठी तयारी केली आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने जत्रेत महिलांचा सहभाग वाढवण्यावर पुजा लांडगे स्वत: घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मकर संक्रांतीचे निमित्त साधून दि. १६ जानेवारीपासून हळदी कुंकू कार्यक्रम राबवला जाणार आहे. मात्र, पुजा लांडगे यांचा वाढता ‘जनसंपर्क’ म्हणजे त्यांचे ‘पॉलिटिकल लाँचिंग’ केले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कन्या साक्षी लांडगे हिसुद्धा जत्रेच्या नियोजनामध्ये सक्रीय झालेली पहायला मिळत आहे.

महिला सुरक्षा आणि सन्मान हाच आमचा संकल्प : पुजा लांडगे
गतवर्षी आम्ही महिला बचतगट सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन अशी ‘थीम’ घेवून ‘इंद्रायी थडी’ जत्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. यावर्षी आम्ही महिला सुरक्षा आणि सन्मान अशी ‘थीम’ ठेवली आहे. प्रत्येक महिलेला ही जत्रा आपली वाटावी, म्हणून आम्ही मेहनत करीत आहोत. विविध कार्यक्रम, खेळ आयोजित केले आहेत. त्यापैकी एक म्हणले महिलांचा हक्काचा असा ‘हळदी-कुंकू’ समारंभ असा आहे. त्यामुळे यामध्ये राजकीय ‘जनसंपर्क’ वाढवण्याचा हेतू नाही, अद्याप निवडणुकांना खूप दिवस बाकी आहेत, अशी प्रतिक्रीया पुजा लांडगे यांनी दिली.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!