Sun. Aug 9th, 2020

‘सारथी’ हेल्पलाईन लाभार्थींनी १५ लाखांचा टप्पा ओलांडला’

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ जानेवारी २०२०) :- महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा/सुविधां बाबतची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत हेल्पलाईन (कॉल सेंटर)दि. १५.०८.२०१३ रोजी सुरू करणेत आलेले आहे. सदरची ‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा २४ तास आठवड्यातील सातही दिवस नागरीकांसाठी उपलब्ध
असून(रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील) त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती
फोनवरून उपलब्ध होत आहे.

दि. १५.०८.२०१३ ते दि. १३.०१.२०२० अखेर सारथी हेल्पलाईनद्वारे एकूण १५,०१,९४५ नागरिकांनी संपर्क साधून माहिती व त्यांचे तक्रारींचे निराकरण करणेबाबत सेवेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण ६,९१,६१३ नागरिकांनी मनपाच्या संकेतस्थळावरून सारथी वेबलिंकद्वारे माहिती प्राप्त करून सदर सेवेचा लाभ घेतलेला आहे.
सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण
करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने महापालिकेच्या सेवांव्यतिरिक्त नागरिकांना
मा.जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विविध सेवा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,
रेशन कार्ड, मतदार नोंदणी इत्यादी सेवा व एम.आय.डी.सी., प्राधिकरण, महावितरण,
आर.टी.ओ., इत्यादी विविध विभागांकडील सेवांबाबतची माहितीउपलब्ध करण्यात
आलेली आहे.
नागरिकांना वेबलिंकद्वारे उपलब्ध करणेत आलेली सारथी पुस्तिका संगणक/आयपॅड/टॅबलेट द्वारे वाचणे व त्यामधील आवश्यक माहिती शोधणे, उपलब्ध करून घेणे, सहजतेने हताळणे सोईचे व्हावे यादृष्टीने सारथी ई-बुक उपलब्ध करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून कामकाजानिमित्त
येणा-या बहुभाषिक नागरिकांच्या सोईसाठी सारथीद्वारे उपलब्ध असलेल्या सर्व सेवांची
माहिती, सारथी पुस्तिका, वेबलिंक, मोबाईल अँप्लिकेशन, ई-बुक इत्यादी मराठी
भाषेबरोबरच इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. आत्तापर्यंत सदर
योजनेचा लाभ एकूण ५,०२,५८६ नागरिकांनी घेतला आहे.

“सारथी” हेल्पलाईन दूरध्वनी व वेबलिंक सेवेचा प्राप्त गोषवारा
(दि. १५ ऑगस्ट २०१३ ते दि. १३ जानेवारी २०२०)
अ.क्र माहितीची साधने लाभार्थींची संध्या
१ संकेतस्थळ व वेब लिंक ६,९१,५१३
२ हेल्पलाईन ३,७६,७२६
३ पी.डी.एफ. पुस्तिका २,७७,६२४
४ ई-बुक १,२२,१६४
५ मोबाईल अँप्लिकेशन २५८४३

६ छापील पुस्तिका ८,०७५
एकूण १५,०१,९४५

दि. १३ जानेवारी २०२० अखेर सारथी हेल्पलाईन येथे विविध विभागांशी संबंधित
एकूण १,६५,७५९ तक्रारी प्राप्त झाल्या असुन त्यापैकी १,६०,७८७ तक्रारींचे निराकरण
झाले असुन तक्रारी निराकरण करण्याची टक्केवारी ९७% इतकी आहे. सदर सेवा व
तक्रारींच्या निराकरणाबाबत विविध नागरिकांनी हेल्पलाईनमध्ये दूरध्वनीद्वारे समाधान
व्यक्त केलेले आहे. ‘सारथी’ या महत्वाकांक्षी प्रकल्पास राज्य शासनाकडील राजीव गांधी
प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा अंतर्गत र.रु.१० लाख प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक प्राप्त झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सुनियोजित उपयोग करून नागरी
सुविधा देणेबाबत महाराष्ट्र राज्यशासनाचा सन२०१२-२०१३ करिता सुवर्णपदक प्राप्त
झाले आहे. सारथी उपक्रम सुरू झाल्यापासून मागील ६ वर्षात राज्यस्तरीय, राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांनी सारथीला भेट दिली आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!