WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

अज्ञात चोरट्यांनी नेला 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून

शबनम न्यूज : हिंजवडी (दि. ०४) – सकाळच्या वेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी होस्टेल हिंजवडी येथे घडली. दीपक कुमार नागराज यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कुमार हिंजवडी येथील बालाजी हॉस्टेलमध्ये राहतात ते रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून रूममध्ये प्रवेश केला रूममधून दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

ताज्या बातम्या