WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

पिंपरी-चिंचवड माध्यमिक विद्यालय थेरगाव या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

शबनम न्यूज : ( पिंपरी चिंचवड ) :- जिल्हा विभाग राष्ट्र व राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध क्रीडा प्रकारात विजेत्या खेळाडूंचा, उत्कृष्ट पंच व आदर्श क्रीडा मार्गदर्शकांचा माननीय श्रीमती आशा राऊत (सहाय्यक आयुक्त क्रीडा) यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले .उत्कृष्ट कबड्डी पंच म्हणून श्री दत्ताजी झिंजुडे (आंतरराष्ट्रीय कबड्डीपंच ) श्री. शेखर रावडी , श्री. रामदास फुगे, श्री .राजू शिंदे, श्री .प्रकाश गावडे, श्री संतोष बुतना, यांचा सन्मान करण्यात आला, आदर्श शिक्षक या पुरस्काराने श्रीमती वंदना आहेर (दिघी प्राथमिक शाळा )श्री गणेश निगडे व श्री अण्णासाहेब वाघोले (रहाटणी प्राथमिक शाळा )श्रीमती सोनाली जाधव, श्रीमती सोनाली पाटील (माध्यमिक विद्यालय थेरगाव) यांना गौरविण्यात आले.
श्री दत्ताजी झिंजुडे आणि त्यांच्या पत्नी सौ संगीता झिंजुडे यांच्याकडून माध्यमिक विद्यालय थेरगाव च्या राज्य अजिंक्यपद विजेत्या 14 वर्ष मुलीचा कबड्डी संघात बारा खेळाडूंना ट्रँक सूट देऊन गौरविण्यात आले.
माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेतील 2018 -19 या वर्षात विविध क्रीडा प्रकारात 7 राष्ट्रीय ,17 राज्य, व 20 विभाग व 39 जिल्हास्तर विजेत्या खेळाडूंना वार्षिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री . एस.डि. शिंदे, श्री चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षक श्री. रामेश्वर पवार, श्री अनिल मगर व ( क्रीडा पर्यवेक्षक) श्री. बन्सी गंगाराम आठवे यांनी केले

 

ताज्या बातम्या