Sat. Oct 3rd, 2020

पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रास्त भाव रेशनिंग दुकाने सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास सुरु करा – माजी खासदार गजानन बाबर

शबनम न्यूज : २२ जुलै ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड –ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष ,माजी खासदार गजानन बाबर यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास धान्य वितरण करण्याकरता मुभा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे मागणी पत्रात बाबर यांनी नमूद केले आहे कि केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा , आत्मनिर्भर योजना तसेच केशरी कार्डधारकांना धान्यपुरवठा रेशनिंग दुकानदारा मार्फत केला जातो व तो वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचणे या कोरोना महामारी च्या परिस्थितीत गरजेचे आहे .जेणेकरून कोणताही नागरिक धान्यापासून वंचित राहणार नाही , व कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही, रास्त भाव रेशनिंग दुकानदार शासनाने दिलेली जबाबदारीचे पालन करण्यात सक्षम आहेत परंतु त्यांना वरील विषयाप्रमाणे सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून केंद्र शासन व राज्य सरकारकडून येणारे धान्य योग्य वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचेल व कोणत्याही रास्त भाव दुकानदाराची तक्रार होणार नाही, तरी आपण यावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा जेणेकरून धान्य वितरण करण्याकरता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.असे बाबर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेली निवेदनाने म्हंटले आहे .

…….

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ताज्या बातम्या

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

error: Content is protected !!